मसूद अझहरवर बंदी घातली जावी यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात केलेले प्रयत्न चीनने रोखल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत काहीसा दुरावा आला असतानाही हे संबंध बळकट करण्याच्या प्रयत्नापोटी उच्चस्तरावरील द्विपक्षीय भेटींच्या मालिकेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे पुढील महिन्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनचे पंतप्रधान ली केक्यांग यांच्याशी झालेल्या भेटीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी या दौऱ्याची घोषणा केली.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतीच रशियामध्ये चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. तेथेही या विषयावर चर्चा झाली होती. तसेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चीनला नुकत्याच दिलेल्या भेटीतही हा विषय चर्चेला आला होता.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President pranab mukherjee to visit china next month
First published on: 23-04-2016 at 02:57 IST