समाजात सध्या नैतिक मूल्यांची घसरण होत आहे अशा वेळी रवींद्रनाथ टागोर यांची शिकवण महत्त्वाची असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.सिमला येथे रवींद्रनाथ टागोर केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर मुखर्जी बोलत होते. या केंद्राने सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा मुखर्जी यांनी व्यक्त केली. आधुनिक युगात समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर या केंद्राने काम केले तर ते उपयुक्त ठरेल. समाजात नैतिक मूल्यांची घसरण होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. अशा वेळी टागोरांच्या विचारांचे महत्त्व अधिक असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.