08 December 2019

News Flash

जम्मू-काश्मीरबाबत घेण्यात आलेला निर्णय नागरिकांच्या फायद्याचा – राष्ट्रपती

७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जम्मू-काश्मीर राज्यात नुकत्याच करण्यात आलेल्या बदलांमुळे तिथल्या जनतेला त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी व्यक्त केला आहे. इथली जनता देशातील इतर नागरिकांसारखे समान अधिकार, समान सुविधा आणि समान सुविधांचा लाभ आणि आनंद घेण्यासाठी समर्थ असतील, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे. ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या अभिभाषणात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रपती म्हणाले, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जनतेला आता पुरोगामी आणि समतावादी कायदे तसेच शिक्षणाच्या अधिकारांसंबंधीच्या तरतुदींचाही लाभ घेता येईल. माहिती अधिकार कायद्यामार्फत सार्वजनिक माहितीही मिळवता येईल. त्याचबरोबर वंचित समुदयाला शिक्षणातील आरक्षण, रोजगार तसेच इतर सुविधाही उपलब्ध होतील. तसेच तिहेरी तलाक सारखी अनिष्ठ प्रथा संपुष्टात आणल्याने आपल्या मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.

दरम्यान, देशाची जनता या उन्हाळ्यात १७व्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे गेली. ही निवडणूक जगातील मानवी इतिहासातील सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया होती. यासाठी मी मतदारांचे अभिनंदन करु इच्छितो कारण त्यांनी ही लोकशाही यशस्वी करण्यासाठी मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थिती नोंदवली.

First Published on August 14, 2019 7:37 pm

Web Title: president ram nath kovind addresses the nation on the eve of the 73rd aau 85
Just Now!
X