News Flash

राष्ट्रपतींनी स्वीकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा; ‘यांच्याकडे’ असेल अतिरिक्त कार्यभार

गुरुवारी दिला होता मंत्रिपदाचा राजीनामा

(संग्रहित छायाचित्र)

कृषीविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. शेतकरीविरोधी वटहुकूम आणि विधेयकांच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा हरसिमरत कौर बादल यांनी ट्वीटद्वारे केली. शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा मंत्रिमंडळातून राजीनामा स्वीकारला आहे.

पंतप्रधान रामनाथ कोविंद यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा तात्काळ प्रभावानं स्वीकारला. तसंच त्यांच्या खात्याचा कार्यभार मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे देण्यात आला आहे. तोमर यांच्याकडे हरसिमरत कौर यांच्या अन्नप्रक्रिया उद्योगमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार असेल. कृषीविषयक विधेयके पंजाबमधील कृषी क्षेत्र नष्ट करतील, असा दावा करत सुखबीर यांनी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत या राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.

आणखी वाचा- “मोदी सरकारची कृषी विधेयकं शेतकरी विरोधी,” केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा

हरसिमरत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार पानी राजीनामापत्र पाठवून सरकारला लक्ष्य केले. शिरोमणी अकाली दलाने वारंवार विनंती करूनही केंद्र सरकारने या विधेयकांबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांच्या हितरक्षणाची आमच्या पक्षाची परंपरा असून, पक्षाचा प्रत्येक सदस्य शेतकरी आहे, असे हरसिमरत यांनी या पत्रात म्हटले आहे.

आणखी वाचा- “मोदीजींचे काही ‘मित्र’ नव्या भारताचे जमीनदार होतील”

कृषीक्षेत्र ‘खुले’ करणारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. त्यातून शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी सुधारणा होणार असल्याचा दावा केला जात होता. आंतरराज्यीय शेतीमाल विक्रीला मुभा देणारी, कृषी बाजार समित्यांची एकाधिकारशाही रद्द करणारी व कंत्राटी शेतीला परवानगी देणारी दोन विधेयके लोकसभेत गुरुवारी मंजूर करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. ही तिन्ही विधेयके शेतकऱ्यांचे नुकसान करणारी असल्याचे कारण देत हरसिमरत कौर यांनी लोकसभेत विधेयकांवर मतदान होण्याआधीच पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 8:47 am

Web Title: president ramnath kovind has accepted the resignation of akali dal harsimrat kaur badal from union council of ministers jud 87
Next Stories
1 भारतात कधीपर्यंत उपलब्ध होणार रशियन करोना लस?; RDIF चे सीईओ म्हणाले…
2 युगांडा : २१९ कैदी अर्धनग्नावस्थेत तुरुंगातून पसार, AK-47 बंदुकीही चोरल्या
3 “कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच; आर्थिक अराजकतेस नोटाबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार”
Just Now!
X