नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर मंगळवारी बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांना शनिवारी दिल्लीतील एम्समध्ये हलविण्यात आले आहे, असे निवेदन राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आले. कोविंद यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सध्या तज्ज्ञांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
छातीत दुखत असल्याने कोविंद यांना शुक्रवारी सकाळी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी त्यांना एम्समध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांंनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर मंगळवारी बायपास शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे एम्सने एका निवेदनात म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 28, 2021 1:54 am