04 March 2021

News Flash

पेट्रोल महागले, तर डिझेलच्या दरामध्ये अल्पशी कपात

नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शुक्रवारी  पुन्हा एकदा चढउतार झाला आहे. आता पेट्रोल प्रतिलीटरमागे २८ पैसे महागले आहे तर डिझेल प्रतिलीटरमागे ६ इतक्या अल्प पैशांनी स्वस्त होणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात.

कर आकारणीसह पेट्रोलसाठी लिटरमागे ३६ पैसे  तर डिझेलसाठी  लिटरमागे सात पैसे मोजावे लागणार आहेत. या दर बदलामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर लिटरमागे ६४ रुपये ५७ पैसे तर डिझेलचा दर लिटरमागे ५२ रुपये ५२ पैसे झाला आहे. पेट्रोलच्या दरातली दोन महिन्यांतली ही तिसरी वाढ आहे तर डिझेलच्या दरातली ही महिनाभरातली दुसरी घट आहे.

यापूर्वी पेट्रोलचे दर ५८ पैशांनी वाढवून तर डिझेल ३१ पैशांनी स्वस्त करून सरकाने नागरिकांच्या खिशाला थोडी कात्री लावली तर थोडा दिलासा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 9:40 pm

Web Title: price of petrol increased and diesel price decreased
Next Stories
1 SAARC परिषद: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे सार्क शिखर परिषद पुढे ढकलली
2 ‘सुलतान’ने काही बोलण्यापूर्वी ‘डॅडीं’चा सल्ला घ्यावा, शिवसेना नेते सुभाष देसाईंचा सलमानला टोमणा
3 चोरांच्या सामानासह म्हैस पोहोचली पोलीस ठाण्यात!
Just Now!
X