11 July 2020

News Flash

संतापजनक! गृहपाठ न करणाऱ्या चिमुकल्यांना बांगड्या घालण्याची शिक्षा

बांगड्या घालताना या मुलांना गृहपाठ न केल्याबद्दल लाज वाटायला हवी, असा अजब तर्कही या शिक्षकाने आपल्या कृतीमागे दिला आहे.

संग्रहित छायाचित्र

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गृहपाठ न केल्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून शिक्षकाकडून हातात बांगड्या घालायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील एका सरकारी प्राथमिक शाळेत गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला होता.

मेहसाना जिल्यातील खेरुला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून गेल्या आठवड्यात गुरुवारी या शाळेतील शिक्षक मनुभाई प्रजापती यांनी इयत्ता सहावीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना गृहपाठ न केल्याने शिक्षा केली. त्यासाठी या शिक्षकाने वर्गातील काही विद्यार्थीनींना आपल्या हातातल्या बांगड्या काढण्यास सांगितले आणि त्या बांगड्या या गृहपाठ न केलेल्या मुलांना जबरदस्तीने आपल्या हातात घालायला सांगितले. बांगड्या घालताना या मुलांना गृहपाठ न केल्याबद्दल लाज वाटायला हवी, असा अजब तर्कही या शिक्षकाने आपल्या कृतीमागे दिला आहे.

वर्गात शिक्षकांनी दिलेल्या या लाजिरवाण्या शिक्षेमुळे हे तीन विद्यार्थी पुढील दोन दिवस शुक्रवार आणि शनिवारी शाळेत गेले नाहीत. याबाबत मुलांकडे त्यांच्या पालकांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी पालकांना घडलेला किस्सा सांगितला. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर घडलेला प्रकार टाकला. तसेच आमची मुलं यापुढे कधीही शाळेत जायचं नाही असं म्हणत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पालकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर शिक्षण विभागाकडून याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जर यामध्ये संबंधित शिक्षक दोषी असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आरोपी शिक्षकाला आजपासून अनिश्चित काळाताली रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी सोमवारपासून शाळेत येण्यास सुरुवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2019 6:09 pm

Web Title: primary school teacher forces boys to wear bangles for not doing homework enquiry ordered
Next Stories
1 गाववाल्यांवर मुख्यमंत्री मेहेरबान, प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपये देण्याचा निर्णय
2 लग्न समारंभामधील अन्नाची नासाडी थांबणार, सरकार दंडात्मक कारवाई करणार
3 चांद्रयान २ चं ‘बाहुबली’ कनेक्शन !
Just Now!
X