स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी अर्थात १५ ऑगस्ट रोजी लाल किल्यावरुन राष्ट्राला उद्देशून होणाऱ्या भाषणात पंतप्रधान देशाच्या प्रगतीसह जनतेच्या विविध प्रश्नांचा उहापोह करतात. त्यामुळे या भाषणाच्या तयारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून आपल्या सूचना नागरिकांना मांडता येणार आहेत.


नरेंद्र मोदी अॅपसह MyGov.in या वेबसाईटवर खास पेज तयार करण्यात आले असून त्यासाठी http://nbt.in/1Fy_Wa या युआरएलवर जाऊन नागरिकांना अपली मते नोंदवता येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारसाठी हा स्वांतत्र्यदिनाचा सोहळा शेवटचा सोहळा असणार आहे. कारण पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असणार आहेत. त्यामुळे हा सोहळा मोदींसाठी महत्वाचा असणार आहे. त्यामुळे आपल्या सरकारने केलेल्या कामांबरोबरच जनतेच्या मानातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न याद्वारे पंतप्रधान करतील.

दरम्यान, या स्वांतत्र्यदिनाच्या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी झळकले होते. त्यामुळे जर हे प्रयत्न यशस्वी झाले तर भारतासाठी ही मोठी बाब ठरू शकेल.