पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शिल्लाँगमधील इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य व वैद्यकीय विज्ञान संस्था येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ७५००वे जनऔषधी केंद्र समर्पित केले.

पंतप्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “औषधे महाग आहेत, म्हणूनच आम्ही गरिबांसाठी ‘जनऔषधी’ योजना आणली आहे ज्यामुळे त्यांच्या पैशाची बचत होईल. मी लोकांना विनंती करतो की, त्यांनी या ‘मोदी की दुकान’ (जसे लोकांना म्हणायला आवडते) मधून परवडणाऱ्या किंमतीवर औषधे घ्यावीत ”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जनऔषधी परियोजने अंतर्गत महिलांसाठी सॅनिटरी पॅड अडीच रुपयांत उपलब्ध होतील.

“पंतप्रधान जनऔषधि परियोजना गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी देशभर चालविली जाते. ही योजना ‘सेवा आणि रोजगार’ याचे माध्यम आहे, यामुळे तरूणांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात, ” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.”देशातील जनऔषधी केंद्रांवर ७५ आयुष औषधे उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”