देश कसा चालवतात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठाऊक नाही अशी घणाघाती टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघू आणि मध्यम उद्योग संपवले. त्यानंतर कोविडच्या वेळी दोन ते तीन मित्रांची मदत त्यांनी केली. करोना काळात अनेक मजूर आपल्या घरी जात होते त्यांना अन्न पाणी मिळालं नाही. लघू आणि मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र मोदींनी हा कणा मोडून टाकला. मी फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं करोनाची साथ येऊ शकते तेव्हा मोदींनी आणि भाजपाने माझी खिल्ली उवडली होती. मार्च महिन्यात मोदींनी सांगितलं २२ दिवसात करोनासोबत लढाई जिंकू असा दावा त्यावेळी करण्यात आला आहे. देश कसा चालवतात हे मोदींना ठाऊक नाही. लघु आणि मध्यम उद्योगांना तोडण्यासाठीच नोटबंदी, जीएसटी लावण्याचे निर्णयही घेण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? – राहुल गांधी

आणखी सहा महिन्यांनी काय होईल ते आत्ताच सांगतो असंही राहुल गांधी म्हणाले. “पुढच्या सहा महिन्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत. कारण लघु आणि मध्यम उद्योग रसातळाला घालवण्यात आले आहेत. येत्या काळात शेतकऱ्यांबाबतच्या काळ्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचंही अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे सहा महिने गेल्यानंतर देशापुढे रोजगाराचा आणि अन्न-धान्याचा प्रश्न आ वासून उभा राहिल” माझं हे वक्तव्य ऐकून पुन्हा एकदा माझी खिल्ली उडवली जाईल. मला त्याची पर्वा नाही. सहा महिन्यांनी काय परिस्थिती असेल तुम्हीच पाहा.

आणखी वाचा- तुम्हाला माहितीये का, चीननं भारताची जमीन का बळकावली?; राहुल गांधींचा मोदींवर हल्ला

अन्न सुरक्षेबाबत आम्ही काही यंत्रणा तयार केल्या होत्या. तसंच देश चालवण्यासाठी इतरही काही यंत्रणा तयार केल्या होत्या. हा यंत्रणा म्हणजे एखाद्या किल्ल्यासारख्या आहेत. मात्र हा किल्ला तोडण्याचा मोदींनी घाट घातला आहे. देश काय आहे तो कसा चालवतात हे त्यांना ठाऊकच नाही अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त त्यांची इमेज प्रिय आहे. त्यांना देशाशी काहीही घेणंदेणं नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.