20 September 2020

News Flash

पंतप्रधान मोदींना बोलण्यासाठी स्क्रिप्टची गरज नसते; नक्वींचे मनमोहनसिंगांना उत्तर

मी असा पंतप्रधान नव्हतो जो माध्यमांशी बोलण्यासाठी घाबरत असे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

मी असा पंतप्रधान नव्हतो जो माध्यमांशी बोलण्यासाठी घाबरत असे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टिकेला आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींना बोलण्यासाठी कोणत्याही स्क्रिप्टची गरज नसते, असे खोचक विधान त्यांनी केले आहे. वृत्तसंस्था एएनआयशी ते बोलत होते.

नक्वी म्हणाले, मनमोहन सिंग हे एक वरिष्ठ नेते आहेत. माजी पंतप्रधान आहेत जेव्हा ते पंतप्रधान होते. तेव्हा कुणा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन बोलत होते. आत्ताही ते तसंच करीत आहेत. त्यांना याची जाणीव असायला हवी की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही मदतशिवाय आणि स्क्रिप्टची किंवा दिग्दर्शकाची गरज नसते.

मी सायलेंट पंतप्रधान होतो, असं मला लोक म्हणत. पण मी न घाबरता पत्रकार परिषदांना सामोरे जाणारा पंतप्रधान होतो, असे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले होते. याद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला होता. लोक मला ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हणतात, त्याचबरोबर मी ‘अॅक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टर’ही होतो, असेही ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 12:43 pm

Web Title: prime minister modi does not need a script to speak naqvis manmohan singh replied
Next Stories
1 …म्हणून ISRO च्या जीसॅट-७ ए चे प्रक्षेपण एअर फोर्ससाठी अत्यंत महत्वाचे
2 आधारसक्ती केल्यास १ कोटींचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा
3 काँग्रेसला हादरा; उत्तर प्रदेशात बुआ- भतिजाची ‘महाआघाडी’ ?
Just Now!
X