आगामी काळात आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसह केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तारखेची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. कारण, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तसे संकेत दिले आहेत.
”२०१६ मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा ४ मार्च रोजी करण्यात आली होती. यंदा मला असं वाटतं की निवडणूक आयोग ७ मार्च रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल.” असं पंतप्रधान मोदी आसाममध्ये म्हणाले आहेत.
प. बंगालमध्ये ‘सिंडिकेट राज’; ‘कट मनी’शिवाय कोणतेही काम नाही
तसेच, ”निवडणुकीची तारीख जाहीर करणं हे सर्वस्वी निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. परंतू घोषणा होईपर्यंत मी आसाम, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळला जास्तीत जास्त भेट देईल.” असं मोदींनी यावेळी बोलून दाखवलं.
आता पश्चिम बंगालने परिवर्तनासाठी मन बनवलं आहे – मोदी
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणूक एप्रिल आणि मे मध्ये होण्याची शक्यता आहे.अद्याप या विधानसभा निवडणुकीच्या तारखेची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र निवडणूक आयोग लवकरच तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 2:34 pm