News Flash

मोदींच्या लोकप्रियतेलाही बसला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; पहिल्यांदाच ग्राफ ५० टक्क्यांच्या खाली

नोटबंदी, कृषी कायदे, नागरिकत्व कायद्यानंतरही मोदींची लोकप्रियता कायम होती, मात्र करोना काळात तिला फटका बसलाय

प्रतिनिधिक फोटो (मूळ फोटो रॉयटर्सवरुन साभार)

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नियोजनावरुन केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका होता असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेलाही या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आलेल्या अपयशाच्या आरोपांमुळे कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’च्या आकडेवारीनुसार मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. तर अन्य एका सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदाच मोदींची लोकप्रियतेचा आलेख ५० टक्क्यांच्या खाली उतरलाय.

नक्की वाचा >> मोदींचं कौतुक करणाऱ्या The Daily Guardian वेबसाईटची नोंदणी उत्तर प्रदेशमधील; सर्वसामान्यांनीच केली पोलखोल

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी समोर आलीय. या १३ देशांच्या राष्टाध्यक्षांमध्ये मोदी सर्वाधिक लोकप्रिय असले तरी १ एप्रिल ते ११ मे दरम्यान त्यांच्या लोकप्रियतेमध्ये १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. एक एप्रिलपूर्वी मोदींची लोकप्रियता म्हणजेच अ‍ॅप्रूवल रेटिंग ७३ टक्के इतकी होती. मात्र ११ मे रोजी त्यामध्ये १० टक्क्यांची घसरण होऊन ती ६३ वर आली. म्हणजेच एक मे ते ११ मे दरम्यान मोदींचे अ‍ॅप्रूवल रेटींग १० टक्क्यांनी कमी झालं. मोदींच्या डिसअ‍ॅप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक मे आधी २१ टक्क्यांवर असणारी हे रेटींग ११ मे नंतर ३१ टक्क्यांवर पोहचलीय.

नक्की वाचा >> केंद्र सरकारला मोठा धक्का… करोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा; सरकारी धोरणांविषयी व्यक्त केलेली नाराजी

केवळ मॉर्निंग कन्सल्टच्या अ‍ॅप्रूवल रेटिंगमध्येच नाही तर भारतीय पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्येही मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. २३ राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमधील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आळं. यामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेआधी मोदींची लोकप्रियता ५७ टक्क्यांपर्यंत होती. मात्र ११ मे पर्यंत यामध्ये ९ टक्क्यांची घसरण झाली आणि ती थेट ४८ टक्क्यांवर आली. पहिल्यांदाच मोदींची लोकप्रियता ५० टक्क्यांच्या खाली आल्याचं संस्थेचं म्हणणं आहे.

ओआरमॅक्स मिडियाच्या या सर्वेक्षणामध्येच चीनसोबत झालेला वाद आणि चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर पंतप्रधानांची लोकप्रियता ६९ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र आज करोनाच्या पार्श्वभूमीवर ही लोकप्रियता २१ टक्क्यांनी कमी होऊन ४८ वर आली आहे. ६९ टक्के लोकप्रियता ही या सर्वेक्षणातील मोदींची सर्वात चांगली कामगिरी होती.

यापूर्वी मोदींची लोकप्रियता नोटबंदी, कृषी कायदे, सुधारित नागरिकत्व कायदा यासारखे निर्णय आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळानंतरही कायम राहिली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका मोदींच्या लोकप्रियतेला बसल्याचं या दोन्ही सर्वेक्षणांमधून दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 9:27 am

Web Title: prime minister narendra modi approval rating goes down with covid 19 second wave scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पेट्रोल-डिझेल दरवाढीला ब्रेक; कोणत्या शहरांत किती आहेत दर?
2 केंद्र सरकारला मोठा धक्का… करोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा; सरकारी धोरणांविषयी व्यक्त केलेली नाराजी
3 तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुळधार पाऊस
Just Now!
X