09 August 2020

News Flash

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांवर पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा

अर्धा तास चालली चर्चा; राष्ट्रपती भवनाकडून ट्विटद्वारे देण्यात आली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांची माहिती देत त्यावर चर्चा केली. आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात पोहचले होते.

पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली.मात्र  या दोघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. राष्ट्रपती भवनाकडून एक ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती यांच्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली असे यामध्ये सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी हे नुकतेच लडाख दौऱ्यावरून परतले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी जखमी जवानांची भेट घेतली होती. सीमेवरील परिस्थितीचा प्रत्यक्षपणे अंदाजही घेतला होता. तसेच, याप्रसंगी त्यांनी जवानांचे मनोबल वाढण्यासाठी त्यांना मार्गदर्शनही केले होते.

सीमावादाच्या मुद्यावरून भारत व चीन दरम्यान सध्या निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती, पाकिस्तान सीमेवरील वाढती घुसखोरी यासह देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी अनेक मुद्दे सध्या भारता समोर महत्वपूर्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 2:50 pm

Web Title: prime minister narendra modi called on president ram nath kovind and briefed him on the issues of national and international importance msr 87
Next Stories
1 गलवान खोऱ्यातील जवानांच्या शौर्यावर लडाखमधील कविनं रचलं गीत; पाहा व्हिडीओ
2 डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रणांगणात उतरणार प्रसिद्ध गायक
3 लष्कराची मोठी कारवाई, काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार
Just Now!
X