10 December 2019

News Flash

PM Modi 69th birthday :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९वा वाढदिवस; नर्मदेच्या पूजनाने करणार दिवसाची सुरूवात

नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये साजरा करणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

PM Narendra Modi 69th birthday :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर) ६९वा वाढदिवस साजरा होत आहे. मोदी नर्मदा नदीची पूजा करून त्यांच्या स्पेशल दिवसांची सुरूवात करणार आहेत. त्यानंतर ते आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. दरम्यान, वाढदिवसानिमित्ताने मोदी यांच्यावर देशवासियांसह जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६९वा वाढदिवस देशभरात साजरा होत आहे. नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये साजरा करणार आहे. सर्वप्रथम मोदी नर्मदा जिल्ह्यातील बंधाऱ्याची पाहणी करणार आहे. त्यानंतर नर्मदा नदीची पूजा करणार आहे. तसेच उपस्थित समुदायाला संबोधित करणार आहे. हा कार्यक्रम उरकल्यानंतर मोदी आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेणार आहेत. नरेंद्र मोदी सोमवारी रात्री दहा वाजता अहमदाबादेत दाखल झाले. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्या देवव्रत, मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी विमानतळावर स्वागत केले. दरम्यान, नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता केवाडियातील सरदार सरोवरजवळ कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत. त्यानंतर त्यांनी सरोवराविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

वाढदिवसानिमित्ताने नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर #HappyBdayPMModi असा ट्रेंड सुरू असून, राजकीय नेते, देशातील नागरिक आणि परदेशातूनही मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

First Published on September 17, 2019 8:35 am

Web Title: prime minister narendra modi celebrate his 69 birthday bmh 90
टॅग Narendra Modi
Just Now!
X