पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ असं पुस्तक लिहिण्यात आलं असून, या पुस्तकाचे भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकावरून वादंग निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर यावरून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे.

भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपाच्या नेत्यांची उपस्थिती होती. जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांनीच या पुस्तक प्रकाशनाची माहिती ट्विट करून दिली होती.

nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
Journalist Limesh Kumar Jangam arrested for demanding ransom of five lakhs
चंद्रपूर : पत्रकार लिमेशकुमार जंगमला पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर

या पुस्तक प्रकाशनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोशल माध्यमातून केली जात आहे.