28 February 2021

News Flash

‘खेळाडूंचे महत्त्व समजणारे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीच’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी राष्ट्रकुल स्पर्धा गाजवणाऱ्या सगळ्याच खेळाडूंनी त्यांची भेट घेतली, सगळ्यांशी मनमोकळा संवादही साधला

आपल्या देशात अनेक दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी पंतप्रधान पद भुषवले. मात्र खेळाडूंना समजून घेणारा, खेळांची आवड असलेला, आम्हाला वडिलकीच्या नात्याने समजवणारा माणूस मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच दिसला. हे उद्गार आहेत राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल जिंकणाऱ्या बबीता फोगाटचे. मला असे वाटत नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआधी पंतप्रधान पदी बसलेल्या एकाही माणसाने खेळांमध्ये इतकी आवड दाखवली किंवा खेळाडूंचे एवढे कौतुक केले असेही बबिताने म्हटले आहे.

गोल्ड कोस्ट या ठिकाणी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूंनी बाजी मारली त्यांची भेट सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली त्यानंतर बबीता फोगाटने ही प्रतिक्रिया दिली आहे. ज्या खेळाडूंनी उत्तम खेळ करून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला त्या सगळ्यांचाच मला अभिमान आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच ज्यांनी देशासाठी पदक जिंकले नाही त्यांची कामगिरी उत्तम होती असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी राष्ट्रकुल स्पर्धा गाजवणाऱ्या सगळ्याच खेळाडूंनी त्यांची भेट घेतली. त्या सगळ्यांशी संवाद साधत आणि त्यांचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांचीच मने जिंकली. तुमच्या खेळामुळे देशाची मान उंचावली आहे. कोणताही खेळाडू दिशा दर्शक असतो. त्यांनी मेरी कोमचेही उदाहरण दिले. खासदार असूनही मेरी कोमने पदक मिळवून दाखवले. देशासाठी खेळण्याची जी उर्मी तुमच्यात आहे ती तशीच टिकवून ठेवा तुमच्या खेळामुळे जगात भारताचे नाव अभिमानाने घेतले जाते असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्यांचे कौतुक केले.

सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. सगळ्याच खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून आनंद झाल्याचे सांगितले. याभेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या खेळाडूंना योग अभ्यासाचे महत्त्व पटवून सांगितले. खेळ खेळताना किंवा त्यानंतर तुम्हाला मानसिक शांततेची गरज असते. योगासने केल्यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य लाभते, खेळाडूंनीही योगा केला पाहिजे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेवेळी मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 5:40 am

Web Title: prime minister narendra modi congratulates cwg 2018 medal winners
Next Stories
1 IPL 2018 एक शर्यत आव्हान टिकवण्याची
2 क्रीडा खात्यातील कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही!
3 पायाभूत स्तरावर लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ! 
Just Now!
X