News Flash

टाळेबंदीबाबत पंतप्रधानांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद

टाळेबंदीचा कालावधी वाढवूनही करोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ वाजता केलेले सर्वात ऐतिहासिक संबोधन म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ चे भाषण. काळ्या पैशावर अंकुश आणण्यासाठी मोदी सरकारने सर्व ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय ८ तारखेला रात्री आठ वाजता जाहीर केला. अवघ्या चार तासांमध्ये या नोटा चलनातून हद्दपार होणार असल्याचे मोदींनी सांगितलं होतं.

नवी दिल्ली : टाळेबंदीचा तिसरा टप्पा या आठवडय़ाअखेर संपत असताना करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच पुढील उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी दुपारी तीन वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. टाळेबंदीमुळे मरगळलेली अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टाळेबंदीचा कालावधी १७ मे रोजी संपत आहे. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासंदर्भात बैठक चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. टाळेबंदी लागू केल्यापासून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची ही पाचवी बैठक आहे.

या बठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बठक घेऊन राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. या बठकीत स्थलांतरित मजुरांच्या प्रवासासंदर्भातही माहिती देण्यात आली. गौबा यांच्या चच्रेत उपस्थित झालेल्या मुद्दय़ांच्या आधारेही मुख्यमंत्र्यांच्या बठकीत सविस्तर विचार केला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने शनिवारी रात्री उशिरा औद्योगिक क्षेत्रांचे व्यवहार सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. टाळेबंदी शिथिल करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्याकडे पाहिले जाते. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या आठवडाभरात शेती, वित्तीय क्षेत्र, वीज, शिक्षण, विमान वाहतूक आदी विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींशी उच्चस्तरीय बठका घेतल्या आहेत. आíथक व्यवहारांना चालना देण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मंत्रिगटाकडून चाचपणी केली जात असून, आíथक व्यवहार बंद केले जाऊ नयेत अशीच शिफारस विविध क्षेत्रातून करण्यात आली आहे.

टाळेबंदीचा कालावधी वाढवूनही करोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. ३ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यात आला तेव्हा देशातील रुग्णसंख्या ३९,९८० होती. ती आता ६२ हजारांवर गेली आहे. गेल्या आठ दिवसांत सुमारे २३ हजार रुग्ण वाढले आहेत. याच कालावधीत मृतांचा आकडा १,३०१ वरून २,१०९ वर पोहोचला. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे टाळेबंदीसंदर्भात कोणता निर्णय घेतला जातो, यादृष्टीने मुख्यमंत्र्यांशी होणारी बठक महत्त्वाची मानली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 4:31 am

Web Title: prime minister narendra modi dialogue with the chief minister on lockdown zws 70
Next Stories
1 अडकलेल्या एक हजार कामगारांना घेऊन श्रमिक रेल्वे रवाना
2 ४ लाख स्थलांतरित मूळ राज्यांत
3 Coronavirus : रक्तद्रव उपचारांचे निष्कर्ष दिलासादायक
Just Now!
X