News Flash

पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रमेव जयते’ योजनेचा शुभारंभ

कामगार कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणाऱया 'श्रमेव जयते' योजनेचा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभारंभ केला.

| October 16, 2014 01:27 am

कामगार कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणाऱया ‘श्रमेव जयते’ योजनेचा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभारंभ केला.
दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात श्रम सुविधा पोर्टल, लेबर इन्स्पेक्शन स्कीम तसेच पीएफसाठी कायमस्वरूपी अकाऊंट नंबरची योजना मोदींनी सुरू केली. त्याशिवाय अखिल भारतीय कौशल्य विकास स्पर्धेच्या विजेत्यांची स्मरणिका आणि व्होकेशनल ट्रेनिंगच्या ब्रँड अॅम्बेरेडर्सची पुस्तिकाही पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. कामगार क्षेत्राशी निगडीत या योजनांचा संघटित व असंघटित क्षेत्रातील लाखो मजुरांना फायदा मिळणार आहे.  
कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या आणि कामगारांमध्ये कौशल्य विकासाच्या उद्देशाने नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्यात काही महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करणार असल्याचा अंदाज ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यापूर्वीच वर्तवला होता.
दुर्दैवाने देशात आज श्रमिकांना आदर मिळत नाही. आपल्या अनेक समस्यांचे समाधान श्रमिकांमुळे होते, पण आपण त्यांना समाजात प्रतिष्ठा देत नाही. त्यामुळे  आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहीजे असे सांगत आजपर्यंत आपण फक्त ‘सत्यमेव जयते’ ऐकत होतो, पण देशाच्या विकासासाठी ‘श्रमेव जयतेही’ तितकेच महत्वाचे असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 1:27 am

Web Title: prime minister narendra modi launches new labour reforms portal shram suvidha
Next Stories
1 उगवत्या महासत्तेची महानासखोरी
2 काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचे ‘पाक तुणतुणे’ मोडले
3 आंध्र प्रदेशला एक हजार कोटींची मदत
Just Now!
X