नवी दिल्ली : कोविड-१९ ची मेड इन इंडिया लस तयार केल्याबद्दल आणि करोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा प्रतिकार करण्यासाठी केवळ एका वर्षातच अन्य उपाययोजनांना चालना दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रीसर्च  सोसायटीच्या बैठकीला संबोधित करताना मोदी  म्हणाले की, भारताने देशात कोव्हॅक्सिन लस विकसित केली, शास्त्रज्ञांनी करोना चाचणी किट तयार करून भारताला स्वयंपूर्ण बनविले, अल्पावधीत  औषधे शोधून काढली, प्राणवायू निर्मितीला चालना दिली.