“पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. आता चर्चेची नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्क या ठिकाणी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्र संघात त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगवर भाष्य केलं.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
” भारताने जलसंरक्षणासाठी जल जीवन मिशनची सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे कामही सुरु केली आहे. आता चर्चेची नाही तर कृतीची गरज आहे. भारतात येत्या काही वर्षांमध्ये जल स्त्रोतांच्या संरक्षणासाठी ५० दशलक्ष डॉलर्स खर्च करणार आहोत. भारतात बायो फ्युल एकत्र करुन पेट्रोल आणि डिझेल विकसित करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत ” असंही प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं.

” आम्ही ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये ई मोबिलिटीवर भर देत आहोत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. भारताने सिंगल यूज प्लास्टिक विरोधात मोहीमही सुरु केली आहे. ” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.