23 November 2020

News Flash

विजयादशमीच्या मुहूर्तावर आज पंतप्रधान मोदी ‘मन की बात’द्वारे साधणार जनतेशी संवाद

कोणत्या मुद्द्यांवर करणार संबोधित, याकडे सर्वांचे लक्ष

संग्रहीत छायाचित्र

विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता (PM Modis Mann ki Baat) रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहे. आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा रविवार आहे. मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत असतो.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी सतत जनतेशी संवाद साधत आहेत. आज ते पुन्हा विजयादशमीच्या मुहूर्तावर देशवासियांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या व्हिडिओला युट्यूबवर मोठ्या प्रमाणात डिसलाईक केल्याचं समोर आलं होतं. यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपाचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला होता. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सातत्याने मोदींच्या मन की बात कार्यक्रमावर टीका केलेली आहे.

“गेल्या २४ तासांत युट्यूबवर ‘मन की बात’ व्हिडिओला डिसलाईक करण्याचा संघटीत प्रयत्न झाला. कॉंग्रेसचा आत्मविश्वास इतका कमी झालाय की, ते हा एक प्रकारचा विजय मिळाल्याप्रमाणे साजरा करतायेत… पण यूट्यूबच्या डेटावरून दिसून येतंय की डिसलाईकपैकी केवळ २ टक्के भारतातून आहे. उर्वरित ९८ टक्के नेहमीप्रमाणे भारताबाहेरुन आहे”, असं ट्विट करत अमित मालवीय यांनी ‘मन की बात’चा व्हिडिओ ‘डिसलाईक’ करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती असा आरोप काँग्रेसवर केला केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 8:22 am

Web Title: prime minister narendra modi to address the nation through mann ki baat at 11 am today msr 87
Next Stories
1 Free COVID Vaccine : ‘लस’कारण
2 काबूलमध्ये बॉम्बस्फोट, १८ ठार, ५७ जखमी
3 १९६२ पेक्षा आताची स्थिती  वेगळी -पेमा खांडू
Just Now!
X