News Flash

फक्त दोन टक्के लोकांकडेच काळा पैसा – डेरेक ओब्रायन

मोदींच्या उपस्थितीमुळे आज राज्यसभेत काय घडणार

Prime Minister Narendra Modi to attend Rajya Sabha : अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून संसदेच्या दोन्ही सभागृहांकडे न फिरकलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी लोकसभेमध्ये पोहोचले. तरीसुद्धा गोंधळ न थांबल्याने काही मिनिटांमध्ये लोकसभेचे कामकाज थांबवावे लागले होते.

देशात २ टक्के लोकांकडे काळा पैसा आहे, पण नोटाबंदीमुळे उर्वरित ९८ टक्के जनता त्रास सोसत आहे अशी टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केली आहे. गुरुवारी राज्यसभेतील कामकाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. मात्र जेवणानंतर मोदी राज्यसभेत न आल्याने विरोधक आक्रमक झाले होते.

गुरुवारी संसदेतील दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी नोटाबंदीवरुन गोंधळ घातला.  लोकसभेत समाजवादी पक्षाच्या खासदाराने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या दिशेने कागद भिरकावल्याने वातावरण चिघळले. अखेर लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. कागद भिरकावण्याच्या प्रकारावर महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले असले तरी राज्यसभेत सरकारला काही अंशी दिलासा मिळाला.

राज्यसभेतील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. दुपारी एकऐवजी बारा वाजताच चर्चा सुरु करावी अशी मागणी विरोधकांनी केली. राज्यसभा सभापतींनी ही मागणी मान्य केली आणि मग चर्चेला सुरुवात झाली. चर्चेदरम्यान सर्वप्रथम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांचे मत मांडेल. नोटा बदलण्यासाठी दिलेला ५० दिवसांचा कालावधी गरिबांना उद्ध्वस्त करु शकतो. तसेच देशाच्या विकास दरात २ टक्क्यांनी घसरण होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तर आमचा नोटाबंदीला विरोध नाही, मात्र ज्या पद्धतीने या निर्णयाची अंमलबजावणी त्याला आमचा विरोध असल्याचे मायावतींनी सांगितले. देशात २ टक्के लोकांकडे काळा पैसा आहे, पण नोटाबंदीमुळे उर्वरित ९८ टक्के जनता त्रास सोसत आहे अशी टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केली. देशातील ९५ % टक्के डेबिट कार्ड फक्त पैसे काढण्यासाठी वापरले जातात, त्याद्वारे खरेदी केली जात नाही याकडेही ओब्रायन यांनी लक्ष वेधले.  लंच ब्रेकनंतर नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील कामकाजात सहभाग न घेतल्याने विरोधक पुन्हा आक्रमक झाले.  हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून विरोधकांनी पंतप्रधानांनी संसदेत येऊन नोटाबंदीवर बोलावे, अशी मागणी लावून धरली होती. या प्रमुख मागणीसाठी विरोधकांनी गेल्या गुरुवारपासून दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होऊ दिलेले नाही.

तत्पूर्वी बुधवारी नोटाबंदीविरोधात विरोधी पक्षांच्या सुमारे दोनशे खासदारांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली होती. अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून संसदेच्या दोन्ही सभागृहांकडे न फिरकलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी लोकसभेमध्ये पोहोचले होते. तरीसुद्धा गोंधळ न थांबल्याने काही मिनिटांमध्ये लोकसभेचे कामकाज थांबवावे लागले होते.

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 20163:11 pm

राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 20162:22 pm

टू जी घोटाळ्याच्या वेळी भाजपनेही पंतप्रधानांनी सभागृहात उपस्थित राहावे असा आग्रह धरला होता, आता तुम्ही पळ काढू शकत नाही – गुलाम नवी आझाद

मधुरा नेरुरकर November 24, 20162:18 pm

विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब

मधुरा नेरुरकर November 24, 20162:17 pm

मोदींच्या गैरहजेरीमुळे विरोधक आक्रमक, विरोधकांकडून मोदी भाग गया अशी घोषणाबाजी

मधुरा नेरुरकर November 24, 20162:16 pm

राज्यसभेचे कामकाज सुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेत अनुपस्थित

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 20161:04 pm
विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 20161:01 pm

आम्ही नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करतो, पण निर्णयाच्या अंमलबजावणीची पद्धत चुकीची – मायावती

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 201612:48 pm

देशातील ९५ % टक्के डेबिट कार्ड फक्त पैसे काढण्यासाठी वापरले जातात, त्याद्वारे खरेदी केली जात नाही – तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 201612:38 pm

नोटाबंदीचा तुघलकी निर्णय मागे घ्या – नरेश अग्रवाल

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 201612:37 pm

जनतेवर पैसे काढण्याची बंदी घाली नका अन्यथा जनता तुमच्यावर बंदी घालेल – नरेश अग्रवाल यांनी सत्ताधा-यांना सुनावले

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 201612:35 pm

दोन हजार रुपयांच्या नोटा सरकारने छापल्या, पण १०० आणि ५०० च्या नोटा आहेत कुठे – नरेश अग्रवाल

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 201612:33 pm

बोटावर शाई लावण्याऐवजी लोकांच्या तोंडाला काळे फासले तर बर झाले असते – नरेश अग्रवाल

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 201612:27 pm

उद्योगपतींना तुम्ही कर्जमाफ करता – नरेंश अग्रवाल यांचा सरकारवर आरोप

विश्वास पुरोहित पुरोहित November 24, 201612:19 pm

नोटाबंदीचा निर्णय उत्तरप्रदेशमधील निवडणुका बघून घेण्यात आला – समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांचा राज्यसभेत आरोप

रोहित धामणस्कर November 24, 201612:14 pm
सरकारने व्यवहारीक अडचणींवर तोडगा काढला पाहिजे- मनमोहन सिंह
रोहित धामणस्कर November 24, 201612:14 pm
रिझर्व्ह बँकेवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे- मनमोहन सिंह
रोहित धामणस्कर November 24, 201612:13 pm
नोटाबंदीमुळे ग्राामीण भागातील लोकांकडे पैसाच नाही- मनमोहन सिंह
रोहित धामणस्कर November 24, 201612:12 pm
नोटाबंदीच्या निर्णयामुळे नोटाबंदीच्या देशाच्या जीडीपीवर विपरीत परिणाम- मनमोहन सिंह
रोहित धामणस्कर November 24, 201612:07 pm
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या राज्यसभेतील भाषणाला सुरूवात
रोहित धामणस्कर November 24, 201612:06 pm
नोटाबंदीच्या मुद्द्यावरून राज्यसभेत चर्चेला सुरूवात
रोहित धामणस्कर November 24, 201612:05 pm
पंतप्रधान चर्चेत नक्कीच सहभागी होतील- अरूण जेटली
रोहित धामणस्कर November 24, 201612:04 pm
कोणत्याही तयारीशिवाय सरकारने निर्णय घेतला त्याला आमचा विरोध- गुलाम नबी आझाद
रोहित धामणस्कर November 24, 201612:04 pm

आम्ही निश्चलनीकरणाच्या विरोधात नाही, लोकांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात- गुलाम नबी आझाद

रोहित धामणस्कर November 24, 201612:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेतील चर्चेसाठी उपस्थित
रोहित धामणस्कर November 24, 201611:43 am

रोहित धामणस्कर November 24, 201611:42 am

रोहित धामणस्कर November 24, 201611:42 am

रोहित धामणस्कर November 24, 201611:41 am

समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकला; सभागृहाचे कामकाज तहकुब

रोहित धामणस्कर November 24, 201611:15 am
लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकुब
रोहित धामणस्कर November 24, 201611:12 am

राज्यसभेत नोटाबंदीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

रोहित धामणस्कर November 24, 201611:12 am

रोहित धामणस्कर November 24, 201610:43 am

विरोधकांचा सरकारशी असहकार; २८ नोव्हेंबरपर्यंत चर्चा करण्यास नकार

रोहित धामणस्कर November 24, 201610:42 am

रोहित धामणस्कर November 24, 201610:41 am

रोहित धामणस्कर November 24, 201610:41 am

रोहित धामणस्कर November 24, 201610:41 am

रोहित धामणस्कर November 24, 201610:41 am

रोहित धामणस्कर November 24, 201610:41 am

रोहित धामणस्कर November 24, 201610:40 am
राजनाथ सिंहांनी बोलविलेल्या बैठकीला विरोधकांची दांडी
रोहित धामणस्कर November 24, 201610:40 am

२८ नोव्हेंबरपर्यंत विरोधक सरकारशी संवाद साधणार नाहीत

रोहित धामणस्कर November 24, 201610:03 am

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 9:12 am

Web Title: prime minister narendra modi to attend rajya sabha
Next Stories
1 नोटाबंदी: उदात्त हेतूसाठी लोक त्रास सहन करायला तयार- श्री श्री रविशंकर
2 Demonetisation: जनधन खात्यांमध्ये एका वर्षात जमा होणारी रक्कम केवळ १५ दिवसांतच जमा
3 दोन वर्षांत लोकपालांची नियुक्ती का नाही?
Just Now!
X