25 September 2020

News Flash

सरकारी धोरणे, निर्णयांबाबत लोकांना आता पंतप्रधानांचे एसएमएस

विविध प्रश्नांवर व धोरणांवर थेट संदेश पाठवून मोदी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

| December 26, 2015 02:20 am

विकासासोबत पुढे जायचे असेल, तर गावांना शहरांशी जोडणारे चांगले रस्ते हवे आहेत, हे ग्रामीण भागातील लोकांनी ओळखले आहे. देशातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून प्रयत्न करण्यात येऊ लागले.

तुम्हाला लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट एसएमएस आला तर नवल वाटू घेऊ नका, कारण नवीन धोरणात्मक निर्णयानुसार तुम्हाला नव्या धोरणात्मक निर्णयांची माहिती एसएमएसच्या मदतीने दिली जाईल व देशहिताच्या मुद्यावर सतर्क केले जाईल. ई-संपर्क योजना गेल्या वर्षी डिजिटल इंडिया योजनेंतर्गत सुरू करण्यात आली होती, त्यातच आता पंतप्रधानांच्या एसएमएसची योजना सुरू करण्यात येत आहे.
विविध प्रश्नांवर व धोरणांवर थेट संदेश पाठवून मोदी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सरकारच्या निर्णयांची माहिती यात दिली जाईल. ई-संपर्क विभागाकडे ८० लाख ई-मेल पत्ते आहेत व १ कोटी मोबाइल क्रमांक केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी एनआयसीकडून घेतले आहेत. यातील ४२ कोटी ई-मेल व एसएमएस पंतप्रधान कार्यालय किंवा संबंधित मंत्रालयांनी लोकांना पाठवले आहेत. सरकार आता क्राऊड फंडिंग प्रारूप सुरू करणार असून, त्याच्या मदतीने पंतप्रधान कार्यालय व इतर मंत्रालये संदेश पाठवतील, त्यासाठीचे पोर्टल सुरू करण्यात येत आहे. आतापर्यंत काही नागरिकांची व सरकारी कर्मचाऱ्यांची ई-मेल माहिती उपलब्ध नसल्याने काही अडचणी येत होत्या, पण नंतर एनआयसीची माहिती वापरून फोन नंबर व ई-मेल पत्ते घेण्यात आले आहेत.
३ डिसेंबरला लोकांना धोरणात्मक माहिती देण्यासाठी याबाबत आदेश जारी करण्यात आला होता. कालांतराने देशातील व्यावसायिकांची माहितीही सरकार गोळा करणार असून, त्यांना एसएमएस पाठवून प्रशासन कार्यक्षमता सुधारण्यासाठी त्यांची मदत घेणार आहे. वादळ किंवा पुराच्या स्थितीत संबंधित नागरिकांना त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जाण्याचे सतर्कतेचे आदेशही दिले जातील. दंगलीच्या स्थितीत काही अफवा असतील तर त्याची माहिती देऊन लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांना हे संदेश मिळतीलच, शिवाय खासगी कर्मचाऱ्यांना एक ऑनलाइन फॉर्म भरून ही सेवा घेता येईल. नागरिक या डेटाबेसमधून बाहेर पडू शकतात, यात मोबाइल क्रमांकाची द्विरुक्ती टाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:20 am

Web Title: prime minister sent sms to people about government policies
Next Stories
1 हिंसाचारावर मात करण्यासाठी समतोल तत्त्वे अंगीकारा
2 दूरचित्रवाणीवर यंत्रमानवाकडून कार्यक्रमाचे सादरीकरण
3 मोदींची धक्काभेट!
Just Now!
X