दीर्घकालीन तोडगा काढवा, ओडिशा सरकारची मागणी

‘यास’ चक्रीवादळामुळे ओदिशात झालेल्या हानीचा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला, तेव्हा वरचेवर येणाऱ्या वादळांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची व आपत्कालीन यंत्रणेची तरतूद करण्याची मागणी ओदिशा सरकारच्या वतीने करण्यात आली.

राज्याला २० हजार कोटींचे साहाय्य देण्याची ममतांची मागणी

यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा अहवाल शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. राज्यातील सर्वाधिक बाधित परिसरांच्या पुनर्विकासासाठी २० हजार कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी या वेळी ममतांनी मोदी यांच्याकडे केली. ममता आणि मोदी यांची पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील कलाईकुंडा येथे भेट झाली आणि दोघांमध्ये केवळ १५ मिनिटे चर्चा झाली.

ममतांचे कृत्य उद्धटपणाचे, अविचारी असल्याची टीका

चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणे हे कृत्य उद्धटपणाचे आणि अविचारी असून मुख्यमंत्र्यांची वर्तणूक हा शिष्टाचार आणि संघराज्यवादावरील आघात आहे, असे केंद्र सरकारने शुक्रवारी म्हटले आहे. मोदी जेव्हा आढावा बैठकीसाठी हजर झाले त्यावेळी पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने एकही जण तेथे हजर नव्हता, ममता बॅनर्जी आणि राज्याचे मुख्य सचिव त्यावेळी त्याच संकुलात होते. तरीही ते मोदींच्या स्वागतासाठी आले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.