05 July 2020

News Flash

करोनातून बरं झाल्याने स्वतःला भाग्यवान समजतोय-प्रिन्स चार्ल्स

मार्च महिन्यात प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण

करोनाची लागण मलाही झाली होती. मात्र या आजारातून मी बरा झालो यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो आहे असं ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी म्हटलं आहे. करोनाचा संसर्ग मलाही झाला होता. मात्र या रोगाची सौम्य लक्षणं दिसत होती. मात्र आता मी बरा झालो आहे. मला याचा निश्चितच आनंद होतो आहे असं प्रिन्स चार्ल्स यांनी म्हटलं आहे.

७१ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांना मार्च महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःचे विलगीकरण केले होते. स्कॉटलँड इस्टेट या ठिकाणी त्यांनी विलगीकरण केले होते. करोनाबाबतचा आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की मला करोनाची काही सौम्य लक्षणं जाणवली. मात्र करोनातून मी बरा झालो याचा मला आनंद वाटतो आहे. स्काय न्यूजशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या जगभरात करोनाची साथ आहे. लोक कोणत्या संकटातून जात असतील याची कल्पना मला आली आहे. करोनाशी लढा द्या, हिंमत हरु नका असंही प्रिन्स चार्ल्स यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 2:30 pm

Web Title: prince charles says he feels lucky after coronavirus recovery scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाबाधित रुग्णांना रुग्णालय निवडण्याचं स्वातंत्र्य देऊ शकतो का? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला विचारणा
2 ‘या’ खासदाराने खासदार कोट्यातील विमान तिकीटं वापरुन ३३ मजुरांना पाठवलं स्वगृही
3 मास्क न घालणं सहाय्यक उपनिरीक्षकाला पडलं महागात, पोलीस उपायुक्तांकडून निलंबनाची कारवाई
Just Now!
X