अमेरिकन पॉप संगीताचा सुपरस्टार प्रिन्सचे काल रात्री वयाच्या ५७ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. प्रिन्सच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला.
मिनेसोटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिन्सच्या घरामध्ये एक मृतदेह आढळला असून, हा मृतदेह त्याचाच असल्याचे सांगितले. गेले काही दिवस प्रिन्स फ्लूमुळे रुग्णालयात दाखल होता. मात्र, त्यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने प्रिन्सला घरी पाठवण्यात आले होते. प्रिन्सच्या बातमीने सर्वत्र ठिकाणांहून हळहळ व्यक्त केली जात आहे.