ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या ९९व्या वर्षी निधन झालं आहे. बकिंगहम पॅलेसकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. राणी एलिझाबेथ यांच्यासोबत प्रिन्स फिलीप यांचा १९४७ साली विवाह झाला होता. ब्रिटिश राजघराण्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक काळ सोबत व्यतीत केलेले पती-पत्नी होते. अवघ्या आठवड्याभरापूर्वीच प्रिन्स फिलीप अर्थात ड्यूक ऑफ एडिनबर्ग रुग्णालयातून उपचारांनंतर पॅलेसमध्ये परतले होते. त्यांच्यावर ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. “अतिशय दु:खाने राणी एलिझाबेथ हे जाहीर करते की त्यांचे पती प्रिन्स फिलीप, द ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचं आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये निधन झालं”, असं बकिंगहम पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
ashok mahato bihar rjd
६२व्या वर्षी लग्न करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या पत्नीला लोकसभेचं तिकीट?

“अतिशय दु:खाने राणी एलिझाबेथ हे जाहीर करते की त्यांचे पती प्रिन्स फिलीप, द ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचं आज सकाळी विंडसर कासलमध्ये निधन झालं”, असं बकिंगहम पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांना चार मुलं, आठ नातू आणि १० पणतू आहेत. प्रिन्स फिलीप यांचा जन्म ग्रीकमधल्या कोर्फू या बेटावर १० जून १९२१ रोजी झाला. राणी एलिझाबेथ ब्रिटनच्या राणी व्हायच्या ५ वर्ष आधी त्यांचा विवाह झाला.