युवराज्ञी डायना हिच्या १९९७ मध्ये झालेल्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. लेडी डायना हिचा मृत्यू नसून ब्रिटनच्या लष्करातील काही लोकांनी तिची हत्या घडवून आणली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाची विश्वासार्हता आणि त्यांचा हत्येशी असलेला संबंध याबाबत स्कॉटलंड यार्डतर्फे नव्याने तपास करण्यात येणार आहे.
३१ ऑगस्ट १९९७ रोजी युवराज्ञी डायना, तिचा प्रियकर डोडी अल फायेद आणि वाहनचालक हेन्री पॉल यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. तिच्या अपघातामागे घातपात असल्याची शक्यता नव्याने वर्तविली गेल्याने स्कॉटलंड यार्डचे वरिष्ठ अधिकारी सर बर्नार्ड होगन होव्ह यांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश जारी केले आहेत. मात्र मेट्रोपोलिटन पोलीस सेवेने या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देताना, या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात येणार नसून डायनाच्या मृत्यूबाबत नव्याने पुढे आलेल्या माहितीची विश्वासार्हता, त्याचा संदर्भ आणि संबंध या गोष्टी तपासण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
डायनाचा मृत्यू आणि ज्युरींचे विधान
डिसेंबर २००६ मध्ये पोलिसांनी लेडी डायना हिच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी हाती घेतलेल्या ऑपरेशन पॅजेटची सांगता झाली. तत्पूर्वी फ्रेंच तपास अधिकाऱ्यांनी काढलेल्या निष्कर्षांशीच या तपासाने सहमती दर्शविली. वाहन चालक पॉल याने मद्यप्राशन करून गाडी चालवताना वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे ही दुर्घटना घडली असा निष्कर्ष या दोन्ही तपासयंत्रणांनी काढला होता. ७ एप्रिल २००८ रोजी ज्युरींनीही चालकाचा निष्काळजीपणा, रस्त्यावरील अन्य वाहनांचीही बेदरकारवृत्ती यामुळे झालेले दुर्दैवी हत्याकांड असाच निष्कर्ष काढला होता. मात्र यानंतरही मृत्यूचे गूढ कायमच होते.
तपासासाठी नवे धागेदोरे
डायना हिच्या मृत्यूमागे ब्रिटनचे लष्कर असल्याचा आरोप ‘स्पेशल एयर सव्‍‌र्हिस’च्या ‘सोल्जर एन’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या सैनिकाच्या सासू-सासऱ्यांनी केला आहे. डायनाचा मृत्यू हा सैन्याच्या एका तुकडीने ‘घडवून’ आणला असून त्याबाबतचे पुरावे पद्धतशीरपणे ‘झाकण्यात’ आले आहेत, असे या सैनिकाने पत्नीला सांगितले होते, असा दावा आह़े