22 September 2020

News Flash

राजघराण्यातील पहिला बळी : स्पेनच्या राजकन्येचा करोना व्हायरसमुळे मृत्यू

अनेक दिवसांपासून सुरू होते उपचार

करोना व्हायरसचा कहर जगभरात वाढतो आहे आणि जगभरात या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे. आता त्यात स्पेनच्या राजघराण्यातील व्यक्तिचाही समावेश झाला आहे. स्पेनची राजकन्या मारिया तेरेसा यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. त्या ८६ वर्षांच्या होत्या. मारिया यांचे बंधु प्रिन्स सिक्सटो एनरिक दी बॉरबोन यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली. 

स्पेनचे राजे फिलिप (सहावे) यांना करोना झाल्याचा संशय होता. मात्र त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर राजकन्या मारिया तेरेसा यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मारिया ह्या राजकन्या तर होत्याच शिवाय त्या एक समाजशास्त्राच्या प्रोफेसरही होत्या. त्या धाडसी होत्या. त्यांची वक्तव्य थेट असायची. शिवाय त्या समाजकार्यात आघाडीवर असायच्या. त्यामुळे त्यांचं नाव रेड प्रिन्सेस असं प्रसिद्ध झालं होतं. २६ मार्च रोजी त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आणि शुक्रवारी त्यांच्यावर माद्रिद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:01 pm

Web Title: princess maria teresa of spain becomes first royal to die from covid 19 pkd 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: “आमच्या कुटुंबातील सहा जणांना लागण झाली मात्र…”; कपूर कुटुंबाने मोदींना सांगितली ‘मन की बात’
2 MannKiBaat : सोशल डिस्टंसिंग वाढवा, इमोशनल डिस्टंसिंग घटवा – मोदी
3 लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयांबाबत देशाची माफी मागतो : पंतप्रधान
Just Now!
X