दारू पिऊन वाहने चालवण्याचा गुन्हा सर्वप्रथम करणाऱ्यांना सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा द्यावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एका समितीने केली आहे. रस्त्यांवरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारावास आणि परवाना निलंबित करणे यासारखी कारवाई सुरू करावी, अशी समितीची शिफारस आहे. त्यानुसार मद्य पिऊन वाहन चालवणे किंवा वाहन चालवताना फोनवर बोलणाऱ्यासही शिक्षा होईल.