‘फेमिना मिस इंडिया २०१६’च्या अंतिम फेरीचा दिमाखदार सोहळा शनिवारी अंधेरीतील यशराज स्टुडियोमध्ये पार पडला. यावेळी ‘मिस इंडिया २०१६’च्या विजेतेपदाचा मुकूट गुवाहाटीच्या प्रियदर्शिनी चॅटर्जी हिने पटकावला. बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानने प्रियदर्शनीच्या नावाची घोषणा केली. प्रियदर्शनी आता ‘मिस वर्ल्ड २०१६‘ सौंदर्यस्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
बंगळूरची सुश्रुती कृष्णा हिला प्रियदर्शनीच्या पाठोपाठ प्रथम उपविजेतीचा मान मिळाला, तर लखनौची पंखुरी गिडवानी ही द्वितीय उपविजेती ठरली. यामुळे सुश्रुता कृष्णा ही ‘मिस इंटरनॅशनल २०१६‘ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.