29 September 2020

News Flash

सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटणार प्रियंका गांधी

जमिनीच्या वादातून सोनभद्रमध्ये मंगळवारी ९ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली याच प्रकरणातल्या पीडितांना प्रियंका गांधी भेटणार आहेत

संग्रहित छायाचित्र

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटणार आहेत. जमिनीच्या वादातून उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये मंगळवारी १० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हिंसाचारात १९ जण जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. बुधवारी ही घटना घडली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, घोरवाल येथील सापही गावात ही घटना घडली असून जमिनीच्या वादातून दोन गटातमध्ये हाणामारी सुरु झाली यावेळी काही जणांनी गोळीबारही केला. त्यानंतर पळापळ सुरु झाली यामध्ये १० लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये ३ महिला आणि ६ परुषांचा समावेश आहे.

भाजपाच्या राज्यात गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. खुलेआम हत्या करण्यात येत आहेत. सोनभद्रच्या उम्भा गावात भू माफियांनी १० जणांना ठार केलं. आदिवासी बांधवांची हत्या करण्यात आली. ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2019 11:28 am

Web Title: priyanka gandhi congress general secretary for uttar pradesh to visit sonbhadra today to meet the family members of those who were killed in firing scj 81
Next Stories
1 ‘इंडियन ऑइल’मध्ये नोकरीची संधी, २३० पदांसाठी होणार भरती
2 भाजपा आमदारांचा उशा, चादरी घेऊन कर्नाटक विधानसभेतच मुक्काम
3 कर्नाटकचं महाभारत: दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा-राज्यपाल
Just Now!
X