News Flash

“सरकार पाडण्यातून सवड मिळाली असेल, तर पंतप्रधानांनी यावरही बोलावं”

प्रियंका गांधींनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा; जाणून घ्या आणखी काय म्हणाल्या आहेत.

जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेनं महारोगराई म्हणून घोषित केलं आहे. भारतात या व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा आता ७३ वर पोहचला आहे. शिवाय, शेअर बाजारवर देखील करोनाचा प्रभाव पडल्याचे दिसत असून, सेन्सेक्स कमालीचा कोसळला आहे. या मुद्यांसह मध्य प्रदेशमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

सेन्सेक्स जबरदस्त कोसळला आहे, जागतिक आरोग्य संघटनेनं करोना व्हायरसला महारोगराई असं घोषित केलं आहे. जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. माध्यमांसमोर स्टंटबाजी करण्यात माहीर असलेल्या पंतप्रधानांना जर निवडून आलेलं सरकार पाडण्यातून सवड मिळाली असेल, तर देशासाठी आवश्यक असलेल्या या विषयांवर देखील बोलावं. असं प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं आहे.

या अगोदर काल राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. जेव्हा तुम्ही काँग्रेसचे निवडून आलेले सरकार अस्थिर करण्यामध्ये व्यस्त होता, तेव्हा जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या दरातील ३५ टक्के घसरणीकडे तुमचे लक्ष गेले नाही . कृपया तुम्ही पेट्रोलचे दर ६० रुपये प्रति लिटरपर्यंत कमी करून देशातील नागिरकांना याचा लाभ देऊ शकता का? यामुळे देशाच्या रखडलेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. असं राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशुन ट्विट केलं होतं.

काँग्रेस प्रवक्त रणदीप सुरजेवाला यांनी देखील सेन्सेक्सच्या घसरणीवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. स्वातंत्र्यानंतरचा गुंतवणुकदारांसाठीचा हा सर्वात खराब दिवस आहे. एका दिवसात ११ लाख कोटी रुपायांच नुकसान झालं असल्याचं ते म्हणाले आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याच ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 2:41 pm

Web Title: priyanka gandhi criticizes pm modi msr 87
Next Stories
1 महाराष्ट्रात घडलं तेच मध्य प्रदेशमध्ये होणार?; भाजपाला भीती ‘अजित पवार-२’ची
2 रजनीकांत बदलणार राजकारण?; राजकीय पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा
3 अरे बापरे! ‘त्या’ ८६ हजार लोकांमध्ये एक होता करोनाग्रस्त
Just Now!
X