News Flash

मेरठला पोहोचल्या प्रियंका गांधी, रुग्णालयात जाऊन घेतली भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखरची भेट

प्रकृती बिघडल्याने चंद्रशेखर आझादला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

मेरठला पोहोचल्या प्रियंका गांधी, रुग्णालयात जाऊन घेतली भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखरची भेट

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे रुग्णालयात जाऊन भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याची भेट घेतली. प्रकृती बिघडल्याने चंद्रशेखर आझादला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियंका गांधी विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. प्रियंका गांधी कोणतीही पूर्वसुचना न देताच चंद्रशेखर आझादची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतीरादित्य सिंधिया होते.

यावेळी प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘चंद्रशेखरला रुग्णालयात येऊन भेटण्यामागे कोणतंही राजकारण नाही. मी त्याचा संघर्ष पाहिला असून त्यामुळेच भेटायला आली आहे. त्याने आपल्या लोकांसाठी संघर्ष केला आहे’. प्रियंका गांधी येणार असल्या कारणाने रुग्णालयात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.

‘चंद्रशेखर यांचा उत्साह मला आवडला, म्हणूनच त्याची भेट घेण्यासाठी पोहोचले. मला त्याचा संघर्ष माहिती आहे. या भेटीला राजकीयदृष्ट्या पाहिलं जाऊ नये’, असं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी जवळपास अर्धा तास रुग्णालयात होत्या.

प्रियंका गांधींच्या भेटीनतर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आनंदी दिसत होता. ‘मी झोपून उठलो तेव्हा प्रियंका गांधी माझ्या समोरच बसल्या होत्या’, असं त्याने सांगितलं. प्रियंका गांधी फक्त माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्या होत्या अशी माहिती त्याने दिली. मंगळवारी सहारनपूर ते दिल्लीपर्यत ‘बहुजन सुरक्षा अधिकार यात्रा’ काढली जात असताना चंद्रशेखरची प्रकृती बिघडली होती. देवबंद येथे पोहोचल्यानंतर परवानगी नसल्या कारणाने पोलिसांनी चंद्रशेखरला ताब्यात घेतलं होतं.

पोलिसांच्या कारवाईमुळे नाराज झालेल्या समर्थकांनी राजमार्गावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी काही कार्यकर्त्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाचाबाचीदेखील झाली. गोंधळ सुरु असतानाचा चंद्रशेखर आझाद बेशुद्ध झाला होता. यानंतर त्याला मेरठमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 8:03 am

Web Title: priyanka gandhi met bhim army chandrashekhar azad
Next Stories
1 मोबाइलवर पबजी खेळणे पडले महागात, गुजरातमध्ये 10 जणांना अटक
2 नायजेरियात इमारत कोसळून नऊ ठार
3 राफेल कागदपत्रे फोडणे हा देशविरोधी कट!
Just Now!
X