News Flash

“भाजपाच्या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे”; प्रियंका गांधींनी केली मागणी

उत्तर प्रदेशात ब्लॉक प्रमुखाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यादरम्यान गैरवर्तन झालेल्या दोन महिलांची प्रियांका गांधीनी भेट घेतली

लखीमपूरमध्ये सपाच्या उमेदवार रितु सिंह यांचा उमेदवारी अर्ज देताना अनिता यादव यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं होतं (फोटो सौजन्य - @INCUttarPradesh)

तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी शनिवारी लखीमपूर खेरी येथे पोहोचल्या. येथे त्यांनी ब्लॉक प्रमुख निवडणुकीसाठी अर्ज भरण्यादरम्यान गैरवर्तन झालेल्या दोन महिलांची भेट घेतली. प्रियांका गांधी अचानक लखीमपूर येथे आल्या. प्रियांका गांधी यांनी येथील पसगंवा गावात समाजवादी पक्षाच्या उमेदवार रितु सिंह आणि अनिता यादव यांच्याशी बोलून विरोधी पक्षांनाही संदेश दिला.

या भेटीनंतर प्रियांका गांधीनी भाजपाच्या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले. भेट देताना प्रियांका म्हणाल्या की एक महिला असल्याने मी अनिताला भेटायला आलो आहे. मी येथे पक्षाची नेता म्हणून आलेली नाही. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या लखीमपूर भेटीचे फोटो शेअर करुन लिहिले की, “पक्षानुसार नाही तर दुखःनुसार नाते जपणाऱ्या नेत्याचे नाव प्रियांका गांधी आहे.” काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांनी लिहिले की, फोव करून भेटणे आणि प्रत्यक्षात भेटणे यात मोठा फरक आहे.

“उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज सुरू आहे, कोणत्या तोंडानं ते स्वत:ला योगी म्हणतात?”

अर्ज दाखल करताना झाले होते गैरवर्तन

ब्लॉक प्रमुखांच्या उमेदवारीच्या वेळी अनेक ठिकाणी भाजपा आणि सपाच्या उमेदवारांमध्ये चकमक झाली. लखीमपूरमध्ये सपाच्या उमेदवार रितु सिंह यांचा उमेदवारी अर्ज देताना अनिता यादव यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं. दोन-तीन जणांनी त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. भाजपा समर्थकांनी महिलेशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 2:11 pm

Web Title: priyanka gandhi met women in lakhimpur kheri who manhandled during block pramukh election abn 97
Next Stories
1 Corona लसीच्या दोन डोसमुळे मृत्यूदरात घट!; ICMR च्या अभ्यासातून खुलासा
2 भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आपलं संरक्षण धोरण सक्षम – अमित शाह
3 “इंधनावरील उत्पादन शुल्कातून केंद्राला मिळणारा एवढा पैसा जातोय कुठे?, मोदींना जाब विचारायला हवा”
Just Now!
X