07 August 2020

News Flash

सरकारविरोधात आंदोलनाची प्रियंकांची तयारी

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा ताबा भविष्यात आपणच घेणार असल्याचे संकेत प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिले आहेत

| January 17, 2015 03:53 am

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा ताबा भविष्यात आपणच घेणार असल्याचे संकेत प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारविरोधात निदर्शने करण्याचा सहा महिन्यांचा कार्यक्रम प्रियंका यांनी आखला आहे.
प्रियंका गांधी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या असून त्यांनी गुरुवारी काँग्रेसच्या जिल्हा, ब्लॉक आणि शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध निदर्शने करण्याच्या सूचना प्रियंका यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2015 3:53 am

Web Title: priyanka gandhi ready to protest against government
Next Stories
1 ‘इनऑर्बिट’ समोरील जागा परत मागण्याचा सिडकोचा आदेश ‘जैसे थे’
2 माकपचा जनाधार घटल्याची ज्येष्ठ नेत्याची कबुली
3 अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी सीसीटीव्ही बसविले जातात, भारतीयांसाठी नाही
Just Now!
X