07 June 2020

News Flash

‘मारहाणीतून हत्या झाल्याची बातमी वाचून माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते’

मी जेव्हा कधी टीव्ही किंवा इंटरनेटवर मारहाणीतून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी पाहते तेव्हा माझ्या मनात प्रचंड राग निर्माण होतो. अशा लोकांविरोधात सरकार कारवाई का

एखाद्या निरपराध माणसाला मारहाण लोक मारहाण करतात, ही मारहाण इतकी भयंकर असते की त्यात त्या व्यक्तीचा जीव जातो, अशा घटना ऐकल्या किंवा वाचल्या तरीही माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते, मला अशा घटनांची प्रचंड चीड येते असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. नॅशनल हेरॉल्डतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये प्रियांका गांधी यांना काही प्रश्न विचारण्यात आले, ज्यामध्ये देशात घडणाऱ्या मारहाणीतून हत्यांच्या घटनांबाबत तुम्हाला काय वाटते? या आशयाचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला त्याला उत्तर देताना आपल्या भावना प्रियांका गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

मला अशा घटनांचा प्रचंड राग तर येतोच शिवाय मला असे वाटते की देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात अशा घटनांबाबत चीड निर्माण झालीच पाहिजे. टीव्ही किंवा इंटरनेटवर अशा बातम्या पाहिल्या की माझे रक्त उसळते. मला अशा घटनांचा प्रचंड राग येतो, अशा घटना घडू नयेत म्हणून अशी मारहाण करण्याऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे असेही मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे.

गोरक्षणाचा मुद्दा पुढे करून हिंसा घडवणाऱ्यांचे समर्थन कधीही होऊ शकणार नाही असे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर दोनच दिवसात प्रियांका गांधी यांनी नाव न घेता मोदींच्या या वक्तव्यावरच टीका केली आहे. कारण गेल्या दोन दिवसांत गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून दोन मृत्यू झाले आहेत.अशात आपण काय करतो आहोत? या घटना नुसत्याच बघत बसायच्या का? असेही प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारले आहेत.

याच कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही एनडीए सरकारवर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. देशात सध्याचे वातावरण हिंसाचाराला खतपाणी घालणारे आहे. काय खायचे? कोणावर प्रेम करायचे? हे प्रत्येक माणसाचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. त्यावर सरकार कोणत्याही प्रकारची मते किंवा निर्णय लादू शकत नाही. सध्याच्या सरकारमधले लोक हेच करताना दिसत आहेत या सगळ्या परिस्थितीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असेही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही या कार्यक्रमात हजेरी होती. वाढता हिंसाचार आणि जमावाकडून होणाऱ्या मारहाणीचा निषेध तर झालाच पाहिजे शिवाय असे करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई केली पाहिजे ज्यामुळे अशा घटनांवर वचक बसण्यास मदत होईल असे मत प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2017 2:29 pm

Web Title: priyanka gandhi sad anger on incidents lynching make mefurious
टॅग Loksatta,Marathi,News
Next Stories
1 जमीन हडपल्याप्रकरणी ‘जेट एअरवेज’च्या उपाध्यक्षाला अटक
2 रामनाथ कोविंद यांच्यासाठी अमित शहांनी घेतला गुजराती ज्योतिषांचा सल्ला
3 लालू आणि नितीश यांच्यातली दरी वाढली, भाजपविरोधी रॅलीवर जदयूचा बहिष्कार
Just Now!
X