प्रियांका गांधींच्या राजकीय प्रवेशामुळे चर्चेला उत आला असून भाजपा नेत्यांनी एकामागोमाग टीकेची सरबत्ती सुरू केली आहे. भाजपाचे दिग्गज नेते सुब्रह्मण्यम स्वामींनीही यामध्ये उडी घेत प्रियांका गांधीवर टीकासत्र सोडले आहे. प्रियांका गांधी मानसिक रुग्ण असल्याचा आरोप स्वामींनी केला. प्रियांका गांधी मानसिक रुग्ण आहेत. तोल ढळला की लोकांना मारहाण करतात, त्यांना बायपोल्ट्री नावाचा रोग झाल्याचा धक्कादायक आरोप स्वामींनी केला आहे.
गेल्या आठवड्यात प्रियांका गांधींच्या राजकरणातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानल्या जाणाऱ्या पूर्वांचलमध्ये प्रियांका गांधी काँग्रेससाठी प्रचार करणार आहेत. त्यानंतर भाजपातील नेत्यांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. ‘प्रियांका गांधी यांना बायपोल्ट्री नावाचा आजार आहे. या आजारामुळे माणसाचा तोल ढळला की तो लोकांना वेड्यासारखा मारत सुटतो. यामुळे माणूस हिंस्त्रही होतो. प्रियांकाचा तोल कधी ढळेल आणि कधी त्या हिंस्त्र होतील याचा थांगपत्ताही लोकांना लागणार नाही’.
प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशामुळे चर्चांना उधाण आलं. त्यावेळी काँग्रेसला कोणीच मतदान करत नाहीये म्हणूनच सुंदर चेहऱ्यांना राजकारणात आणलं जातं आहे. सुंदर चेहऱ्यांमुळे मत मिळेल अशी काँग्रेसला आशा आहे असं वक्तव्य भाजप प्रवक्ते कैलाश विजयवर्गीय यांनी शनिवारी केलं होत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2019 5:03 pm