News Flash

प्रियांका गांधींमुळे वाचला ‘त्याचा’ जीव!

अपघातात जबर जखमी झालेल्या एका तरुणाचा जीव कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघाच्या दौऱयावर असलेल्या प्रियांका गांधी-वद्रा यांच्यामुळे वाचला.

| November 20, 2013 10:48 am

प्रियांका गांधींमुळे वाचला ‘त्याचा’ जीव!

अपघातात जबर जखमी झालेल्या एका तरुणाचा जीव कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघाच्या दौऱयावर असलेल्या प्रियांका गांधी-वद्रा यांच्यामुळे वाचला. प्रियांका गांधी यांनी आपल्या सुरक्षेच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आणि स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना अपघातग्रस्त तरुणाला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले आणि तरुणाला लवकर उपचार मिळू शकले.
प्रियांका गांधी महाराजगंज भागातून जात असताना रस्त्यावर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नीरज असे या तरुणाचे नाव आहे. तो अमर्वा भागातील राहणारा आहे. स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना छोट्या टेम्पोने त्याला उडवल्याने तो रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडला होता. प्रियांका गांधींनी सूचना केल्यानंतर सुरुवातीला त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याच्या डोक्याला जबर मार लागला असल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्याला लखनौमधील रुग्णालयात नेण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2013 10:48 am

Web Title: priyanka gandhi vadra plays saviour for 22 yr old accident victim in rae bareli
Next Stories
1 एटीएम केंद्रात महिलेवर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्हीत हल्लेखोर कैद
2 आत्मघाती हल्ल्यात इजिप्तचे १० जवान ठार
3 प्रशांत भूषण यांचा माफिनामा
Just Now!
X