रायबरेली आणि गांधी घराणं यांचं एक अतूट नातं आहे. मात्र याच रायबरेलीत प्रियंका गांधींबाबत एक पोस्टर लावण्यात आलं आहे. सध्या या पोस्टरची चर्चा चांगलीच रंगली आहे. प्रियंका गांधी हरवल्या आहेत असे हे पोस्टर आहे. ज्यावर प्रियंका गांधी यांचा फोटो आहे. तसेच अखियाँ थक गयी पंथ निहार.. आजा रे परदेसी.. बस एक बार अशा ओळीही लिहिण्यात आल्या आहेत. तसंच प्रियंका गांधी यांना इमोशनल ब्लॅकमेलर असेही या पोस्टरमध्ये संबोधण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरचंदपूरमध्ये रेल्वे अपघात झाला, उंचाहारमध्ये दुर्घटना घडली, रालपूरमध्येही दुर्घटना घडली तरीही रायबरेलीच्या कथित नातेवाईक कुठे आहेत? नवरात्र दुर्गापूजा, दसरा या सणांना तर तुम्ही दिसला नाहीत आता थेट ईद च्या दिवशी दिसणार का? असाही प्रश्न विचारण्यात आला. काही अज्ञातांनी ही पोस्टर्स लावली आहेत. ही पोस्टर्स कोणी लावली आहेत हे समजू शकलेले नाही. मात्र या पोस्टर्सची चर्चा रायबरेलीत रंगली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka vadra missing posters put up by unidentified people in raebareli
First published on: 22-10-2018 at 21:52 IST