हैदराबाद : येथील भारत बायोटेकच्या अमेरिका व कॅनडात भागीदार असलेल्या ऑक्युजेन इनकॉर्पोरेशन या कंपनीने कॅनडात कोव्हॅक्सिनला मान्यता देण्याबाबत अर्ज केला असून हेल्थ कॅनडा ही संस्था या प्रस्तावाचे परीक्षण करून मान्यता देणार आहे.

अमेरिकेत या लशीला मान्यता नाकारण्यात येऊन अधिक माहिती उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले होते. भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील निकाल जाहीर केले असून २५ हजार ८०० प्रौढ व्यक्तींमध्ये ती सुरक्षित व परिणामकारक ठरली आहे.   हेल्थ कॅनडा ही कॅनडातील औषध नियंत्रक संस्था आता ऑक्युजेनच्या प्रस्तावावर विचार करीत आहे.