डोकेदुखी आणि सर्दीपासून हमखास आराम मिळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ या औषधाच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारकडून फिक्स डोस कॉम्बिनेशन म्हणजेच एकाच औषधात दोन ड्रग्ज असणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीने या गोळीचे उत्त्पादन आणि विक्री थांबवली आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी पॅरासिटेमॉल, फेलनेफ्रिन, कॅफीनसारखी औषध बनवते. आमचे ‘विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ हे उत्पादनदेखील सरकारने बंदी टाकलेल्या फिक्स डोस कॉम्बिनेशनच्या सुचीत येत आहे. त्यामुळे आम्ही तातडीने त्याचे उत्पादन आणि विक्री थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयानंतर कालच फायझर अँण्ड अॅबॉटच्या कोरेक्स आणि फेन्सेडिल या कप सिरपचे उत्पादन आणि विक्री थांबविण्यात आली होती.