ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना १० ऑगस्ट रोजी उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान कोलकातातील बेले व्ह्यू रूग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी ट्विटवरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी</p>

काँग्रेस पक्षाकडूनही श्रद्धांजली

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंघ राठोड

खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक</p>

केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन

युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चिरंजीवी राव

उद्योजक नवीन जिंदाल

भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय

संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

काँग्रेस नेते अशोक गोहलत

दहा वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेले चॅटर्जी यांनी १९६८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. १९७१ मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते. १४ व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र होते.