एका कौटुंबिक खटल्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे झारखंड उच्च न्यायालयाने या कुटुंबाची तीन राज्यांमध्ये असलेली मालमत्ता दोन आठवडय़ांत जप्त करण्याचे आदेश तिन्ही राज्यांच्या पोलीसप्रमुखांना मंगळवारी दिले. एका महिलेला तिच्या लहान मुलांना ताब्यात देण्याबाबतच्या खटल्यात न्यायालयाने हा मालमत्ता जप्तीचा निर्णय दिला आहे.एका कौटुंबिक खटल्यात बोकारो येथील स्थानिक न्यायालयाने निधी नावाच्या महिलेला तिची तिन्ही लहान मुले ताब्यात देण्याबाबत सासरच्या मंडळींना आदेश दिला होता. या प्रकरणी निधीचे सासरे श्रीप्रकाश सिंग यांनी हा निर्णय अमान्य करीत वरच्या न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे सखोल निरीक्षण करीत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.