07 April 2020

News Flash

कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात दहशतवादी सोपवण्याचा प्रस्ताव; पाकिस्तानचा दावा

दहशतवाद्याचे नाव उघड केले नाही

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात २०१४ मध्ये पेशावरमध्ये शाळेवर हल्ला घडवणारा आणि अफगाणिस्तानच्या कैदेत असलेला दहशतवादी सोपवण्याचा प्रस्ताव मिळाला होता, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी केला आहे.

२०१४ मध्ये पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला करून मुलांची क्रूर हत्या करणारा दहशतवादी अफगाणिस्तानच्या कैदेत आहे. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात दहशतवादी देण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला होता, असा दावा असिफ यांनी ‘एशिया सोसायटी’मध्ये उपस्थितांना संबोधित करताना केला आहे. यावेळी त्यांनी दहशतवादी आणि प्रस्ताव ठेवणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या नावांचा उल्लेख केला नाही.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीचा आरोप आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांना राजनैतिक मदत देण्यात यावी, अशी भारताने अनेकदा मागणी केली होती. मात्र पाकिस्तानने ती मागणी मान्य केली नाही, असे भारताने म्हटले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. पाकिस्तानसाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2017 10:00 am

Web Title: proposal made to swap kulbhushan jadhav for terrorist claims pakistan minister
टॅग Pakistan
Next Stories
1 ‘प्लेबॉय’चे जनक ह्यू हेफनर यांचे निधन
2 ‘बुरे दिन’ आले की मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईक करतं; चिदंबरम यांचा हल्ला
3 Panama Papers Case: ‘ईडी’कडून बच्चन कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता
Just Now!
X