19 September 2020

News Flash

एका व्यक्तीकडे सर्व अधिकार नकोत!

फली नरिमन यांचे राष्ट्रपतींना आवाहन

फली नरिमन यांचे राष्ट्रपतींना आवाहन
विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रपतींनी रोखावा, तसेच एका व्यक्तीच्या हाती सर्व अधिकार असता कामा नयेत, असे आवाहन प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली नरिमन यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना केले. ‘स्टेटमेंट ऑफ इंडियन लॉ’ या गोविंद गोयल यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी नरिमन बोलत होते. या पुस्तकात सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून घटनात्मक पीठाने दिलेल्या २००० निकालांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नरिमन यांनी आपली व्यथा थेट मुखर्जी तसेच सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्यापुढे मांडली.
लोकशाहीत विरोधातील स्वर महत्त्वाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न नरिमन यांनी केला. कुणाचाही नामोल्लेख त्यांनी केला नाही. मात्र, एका व्यक्तीच्या हाती सर्व सत्ता आहे हे पाहून देशातील विचारवंतांमध्ये चिंता असल्याचे जाणवल्याचे नरिमन यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत जरी काही दोष असले तरी, तरी ती सुरळीत चालण्यासाठी विरोध असलाच पाहिजे. या वेळी त्यांनी तत्कालीन संसद सदस्य पिलू मोदी व व झुल्फीकार अली भुट्टो यांच्या भेटीतील प्रसंग विशद केला. भुट्टो यांच्यावर खुनाच्या गुन्ह्य़ात देहदंडाची शिक्षेची टांगती तलवार होती. एरवी भारतीय लोकशाहीची थट्टा उडवणाऱ्या भुट्टो यांनी अशा वेळी लोकशाहीचे महत्त्व या क्षणी मान्य केले होते. सुदृढ लोकशाहीसाठी सत्तासंतुलन गरजेचे असल्याचे नरिमन यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 12:06 am

Web Title: protect dissent one person shouldnt have all powers nariman to president
Next Stories
1 टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील कारभाराची चौकशी
2 कर्नाटक भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी येडियुरप्पा
3 तेलंगणा, आंध्रात उष्माघाताने १११ जणांचा बळी
Just Now!
X