देशभरात काल(दि.२६) प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्ली पार हादरुन गेली. नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. यादरम्यान दिल्लीतील आयटीओ येथे ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी मारलेल्या गोळीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आणि तिथेच धरणे आंदोलनाला बसले.

पोलिसांनी गोळीबार केला आणि गोळी लागून नवनीत यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत होता. त्यावर पोलिसांनी गोळीबार केल्याचं नाकारलं, त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही दृष्य जारी केलं आहे. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतंय. ट्रॅक्टर अतिशय वेगात चालवण्यात येत होता. यामुळे बॅरिकेडला धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव नवनीत सिंह असं होतं. २७ वर्षांचा नवनीत उत्तराखंडमधून ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्यासाठी आला होता. बघा व्हिडिओ

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन : हिंसाचारानंतर पंजाब-हरयाणात अलर्ट! मोबाईल सेवा बंद

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराची गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.