News Flash

संतापाचा कडेलोट! भाजपा आमदारावर शेतकऱ्यांचा हल्ला; कपडेही फाडले

काँग्रेस, शिरोमणी अकाली दलाने घटनेचा केला निषेध

Photo: Twitter video screengrab

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, शेतकऱ्यांच्या संतापाचा आता कडेलोट होत असल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने भाजपा आमदारावर हल्ला केला. इतकंच नाही, तर त्यांचे कपडेही फाडले. संतापलेल्या शेतकऱ्यांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.

मागील काही महिन्यांपासून पंजाबमधील भाजपा नेते शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करताना दिसत आहे. त्यातच आता पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये शेतकऱ्यांच्या गटाने भाजपा आमदाराला निशाणा बनल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपा आमदार अरुण नारंग यांच्यावर शेतकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.

अबोहरचे आमदार नारंग हे शनिवारी स्थानिक नेत्यांसह मलोतमध्ये पत्रकार परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी घेराव घातला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या दिशने शाही फेकली. अचानक झालेल्या शाही हल्ल्यानंतर पोलिसांनी नारंग यांच्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांना एका दुकानात नेलं. मात्र, थोड्या वेळाने आमदार नारंग आणि भाजपा कार्यकर्ते बाहेर आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आमदार यांचे कपडेही फाडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर पीटीआयशी बोलताना आमदार नारंग म्हणाले,”मी मलोतमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी गेलो होतो, मात्र शेतकऱ्यांनी परवानगी दिली नाही. शेतकरी आक्रमक झाले आणि मला वेढा दिला. मला काही शेतकऱ्यांनी धक्के मारले. त्याचबरोबर माझे कपडेही फाडण्यात आले,” असं नारंग यांनी म्हटलं आहे. आमदार नारंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी निषेध केला आहे. त्याचबरोबर शिरोमणी अकाली दलानेही नाराजी व्यक्त करत घटनेचा निषेध केला आहे. भाजपा आमदारावर हल्ला केल्याप्रकरणी २५० ते ३०० अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तींविरुद्ध भाजपा आमदाराच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 1:07 pm

Web Title: protesting farmers thrash bjp mla tear his clothes bmh 90
Next Stories
1 क्रिकेटपटू मिताली राजने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार; म्हणाली, ‘हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण’
2 विमान हवेत असतानाच प्रवाशाने केला आपातकालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; इतरांच्या काळजाचा ठोकाच चुकला
3 “देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या करोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेल्या”
Just Now!
X