वॉशिंग्टन : ‘मी केवळ हिंदू आहे म्हणून अमेरिकेबाबतच्या माझ्या वचनबद्धतेवर कुणी शंका घेत असेल तर ते गैर आहे. हिंदू नसलेल्या नेत्यांना हा निकष न लावता, केवळ मलाच तो लावला जात असेल तर तो पक्षपात आहे. त्यातून धार्मिक भेदभावच दिसून येतो’, असे काँग्रेस सदस्या तुलसी गॅबार्ड यांनी म्हटले आहे.

तुलसी गॅबार्ड११ जानेवारीला  यांनी २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवारीच्या शर्यतीत उडी घेतली आहे. गॅबार्ड हिंदू राष्ट्रवादी असून त्या अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून इच्छुक आहेत. हवाईतून त्या चार वेळा निवडून आलेल्या आहेत. त्यांनी एका लेखात म्हटले आहे की, केवळ हिंदू अमेरिकन असल्याने समर्थक, निधी दाते संशयाने पाहात आहेत. आधाराशिवाय त्यांनी माझ्याविरोधात चालवलेला प्रचार गैर आहे. ‘माझ्यावर हिंदू राष्ट्रवादी असल्याचा आरोप होतो, उद्या कुणावर केला जाईल. परंतु देशाप्रती माझी वचनबद्धता त्यामुळे कमी होत नाही, असे त्या म्हणाल्या.